लोहारा/प्रतिनिधी
देश हितासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपा उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील यांनी केले. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं – रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्राचार्थ लोहारा तालुका भाजपाची शहरातील जगदंबा मंदिर येथे दि.13 एप्रिल 2024 रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, प्रमोद पोतदार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, दिलीप पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विरेंद्र पवार, प्रशांत माळवदकर, शुभम गोसावी, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, संजय कदम, सुरेंद्र काळप्पा, मल्लीनाथ फावडे, प्रशिद्धी प्रमुख निकेश बचाटे, शिवा थोरात, रविराज कारभारी, तालुका चिटणीस युवराज जाधव, गोविंद यादव, महेश पोतदार, शिवाजी दंडगुले, बालाजी भाजणे, बाळासाहेब गायकवाड़, ओबीसी तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, प्रदिप भाऊसाहेब पाटील, दत्ता कडबाने, सुयशकुमार दंडगुले, अन्वर जिलानी शहा, कल्याण ढगे, शुभम गोसावी, दत्ता दाजी देवकर, अदि उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपल्याला एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. देशाला जेंव्हा नेतृत्व खंबीर मिळते तेव्हा देश सुरक्षित असतो. या नेतृत्वामुळे जगात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य किंवा देशाला सुरक्षा देण्याचा विषय असेल यामध्ये आपण अग्रेसर आहोत म्हणून मोदींजीना मदत म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेला मदत त्यामुळे त्यांचे हात आपण बळकट केले पाहिजे. या कणखर नेतृत्वासाठी व देश हितासाठीच आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं – रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना विजयी करावे, असे सांगितले. पुढे बोलताना राहुल दादा पाटील म्हणाले कि, आपल्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करुण देऊन विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तसेच भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कोर्टात जावुन शेतकऱ्यांना पिकविमा मिळवुन दिला आहे. व तेरणा टृस्ट च्या माध्यमातुन जिह्यातील गंभीर आजारावरील रुग्णांना मोफत उपचार करुण सामाजिक भावना जपली आहे. उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी देखील जि.पं.उपाध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. उमरगा लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणुन मोठ्या प्रमाणात विकास करुण उमरगा लोहारा तालुक्याचा कायापालट केला आहे. हे सर्व झालेली विकास कामे कार्यकर्त्यांनी
लोकापर्यंत जावुन सांगावे, असे यावेळी सांगीतले. या बैठकिस तालुक्यातील व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.