राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांचा राजीनामा

उमरगा : उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मेल द्वारे दि६ रोजी दिला आहे.
देण्यात आलेल्या राजीनाम्यात प्रा. बिराजदार यांनी, सन 1978 सालापासून कै. आमदार भाऊसाहेब बिराजदार यांच्यापासून आजतागायत बिराजदार कुटुंबीय 40 वर्षापासुन तर मी स्वताः गेले 33 वर्ष आदरणीय पवार कुटूंबीयासोबत आहोत.
1980 ते 1984 या कालावधीमध्ये साहेबांना सोडून मोठ्या प्रमाणात पक्षांतर करुन जवळची मंडळी गेली त्याही वेळेस उर्वरीत 6 आमदारांन पैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील कै. भालचंद्र उर्फ भाऊसाहेब बिराजदार खंबीरपणे आपल्यासोबत होते.
भाऊसाहेबां नंतर 1992 च्या जिल्हा परीषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आग्रहाने मला उभे केले त्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वाधीक मतांनी मी विजयी झालो हातो. आज तागायत ही परंपरा खंडीत होऊ दिली नाही. आजपर्यंतही जिल्हापरिषद सदस्य होतो. पक्षाच्या वतीने एकाही मोठ्या पदाची संधी मिळाली नसताना जिल्ह्यात मा. डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेब व पक्ष प्रेमा पोटीच काम करीत आलो.
त्यानंतरही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2019 साली घडलेल्या राजकीय भुकंपा नंतर आमचे श्रध्दास्थान मा. डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या बद्दल नितांत आदर व अंतकरण असतानाही आम्ही भाजपा मध्ये न जात आदरणीय पवार साहेबांसोबत जान्याचा निर्णय घेतला व जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव केला. या अत्यंत अडचणीच्या काळात माझ्यासारख्या कार्यकत्यांवर विश्वासाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपण दिली, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार किंवा खासदार नसतानाही कार्यकत्यांना धिर देत राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकत्याची टिम जिल्हा भरात आज सक्षम पणे उभी आहे. आज पर्यंतच्या काळात प्रामाणीक पणे पक्ष बळकटीसाठी निष्ठेने काम केले आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचं दैवत आहे. भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याला उभा करण्यात आमची पंधरा वर्ष गेली. हा कारखाना नैसर्गीक परीस्थिती मुळे आडचणीत आल्या नंतर मा. अजित दादा पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच पुन्हा तो जोमाने सुरु झाला. ज्याचा फायदा उमरगा लोहारा तालुक्यासह शेजारील औसा, निलंगा व तुळजापूर येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. मा. आजीत दादा मुळे जिल्ह्यातील दोन कारखान्याला नवसंजीवनी मिळाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पवार कुटुंबीय यांच्या प्रतिष्ठा व हिता पलीकडे स्वताःचा विचार कधीही केला नाही. आणि यापुढेही करणार नाही. काल झालेल्या पक्षाच्या विभाजनामुळे आता आम्ही कोणती भुमीका घ्यायची असा यक्ष प्रश्न आमच्या समोर ऊभा आहे. पक्षाचे झालेले विभाजन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी अनाकलनिय आहे. यापुढेही राष्ट्रवादी काँगेस पक्ष, पवार कुटुंबीय यांच्यावर निष्ठा ठेऊन जिल्ह्यातील कार्यकर्त्या साठी कार्य करीत राहणार आहे.राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे. असा राजीनाम्यात उल्लेख केला आहे. हा राजीनामा मेलद्वारे व व्हाट्सअप द्वारे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पाठवण्यात आला आहे.