स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे लोहारा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

लोहारा / प्रतिनिधी
2018 – 2019 मध्ये सिमेन्स गमेशा या कंपनिने लोहारा तालुक्यात आपले प्रकल्प उभा केले होते मात्र त्याचा योग्य तो मोबदला 2017 च्या शासन आदेशानुसार देण्यात आला नाही वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाने दाखल न घेतल्यामुळे स्वराज्य संघटनेने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन घेतले,मात्र सावलीत बसलेले शेतकरी यांना तहसील प्रशासनाने पोलिस प्रशासनाचा वापर करून 45 सेल्सिस तापमान असलेल्या रणरणत्या उन्हात बसवले यामुळे संतापाची लाट उठली असून विविध लोकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला दुपारी तीन वाजले तरीदेखील प्रशासनाने आंदोलन कर्त्यांची भेट घेतली नाही, आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख दोन मागण्या असून पहिली मागणी शासनआदेशा प्रमाणे मूल्यांकन करून मोबदला देण्यात यावा व खोटी कागदपत्रे बनवून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केल्या बद्दल गुन्हे दाखल करण्यात यावे व जोपर्यंत मूल्यांकन होत नाही तोपर्यंत पवनचक्की चे प्रकल्प बंद करण्यात मागणी करण्यात आली.
यावेळी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत थोरात,सामाजिक कार्यकर्ते महेश गोरे उपाध्यक्ष तानाजी पाटील कार्याध्यक्ष युवराज साळुंखे सचिव बळी गोरे शंभू वाले संजय मोहटे तसेच शेतकरी महेश सुतार, बालाजी मुळे,कोंडीबा जाधव, अगतराव लोमटे,राम मुळे, अच्युत जाधव,तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.