वाढदिवसानिमित्त बापुराव पाटील यांचा सत्कार

लोहारा : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अचलेर ग्रामपंचायत सदस्य शिवराज कमलापुरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शुक्रवारी सयंकाळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिध्द गायक अजित कडकडे यांचे दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अचलेर ग्रामपंचायत सदस्य शिवराज कमलापुरे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल कोकरे, कल्लु (मामा) गोपने ,महादेव पाटील, अप्पु सुतार, कुमार कुंभार ,अस्लम शेख समीर पटेल यांच्यासह आदी उपस्थित होते.