खंडोबा यात्रा चंपाषष्ठी(सठ) मोठ्या उत्साहात साजरी

किल्लारी ( ता. औसा ) / प्रशांत नेटके
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील श्री खंडोबा यात्रा चंपाषष्ठी ( सठ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी तपसे चिंचोली ,व परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पालखी सोहळ्यात येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घेअसा जयघोष करत भांडार खोबऱ्याची उधळण करीत जयघोष करण्यात आला.
चंपाषष्ठी महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मंदीर कमिटी व गावातील तरुण मित्र मंडळाच्या वतीने 17 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
तपसे चिंचोली गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा चंपाषष्ठी सठ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम (ता .14 ) ,सत्संग सोहळा (ता. 15), खंडू वाघे राजुरीकर(16) , जय मल्हार वाघ्या मुरळी हाडोळी(17) ,तसेच बोरामनी व अनसरवाडा यांच्या भव्य जुगलबंदीमय भारुडाचा कार्यक्रम (18) गावातील भाविक भक्तांच्या उपस्थित मोठया उत्साहात संपन्न झाला. दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी सौ सुनंदा मोहन नेटके व मोहन राघोबा नेटके यांच्या हस्ते श्री च्या मूर्तीचा अभिषेक व अभ्यंगस्नान व महावस्त्र अलंकार पूजा करण्यात आली. त्यानंतर निमंत्रित मानाच्या काठ्या व पालख्या यांच्या समवेत गावभर वाजतगाजत सबिना सोहळा संपन्न झाला .यावेळी गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी सबिना सोहळ्याचा आनंद घेतला. त्यांनतर यात्रा कमिटी च्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद नेटके ,शिवशंकर शिंदे ,मोहन नेटके , अंगद नेटके ,दिनेश सरवदे , प्रवीण कांबळे ,प्रमोद नेटके ,प्रदीप नेटके, समीर मोरे ,गणेश नेटक,सिताराम शिंदे , विक्रम घोरपडे ,अझहर फकीर ,शुभम जाधव ,खंडू नेटके , जालिंदर कांबळे,अवधूत नेटके, प्रशांत नेटके यांच्यासह गावातील सर्व युवकांनी परिश्रम घेतले.