स्वातंत्र सैनिक समरगाथा

{हेंद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या लढयात अग्रगण्य असलेले स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक वसंत (अण्णा )उंबरे }
लेखिका सौ. शीला उंबरे (पेंढारकर ) स्वातंत्र सैनिक वारसदार तथा संपादिका , लोकपात्रिका
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दक्षता इतिहास नुसता कानावर पडला तरी अंगावर आजही शहारे उभे राहतात हजारो नीर अपराधी कत्तल आणि रक्तरंजित लढ्याची किनारा असलेल्या लढ्यात अनेकांनी हुतात्मे पत्करले घरा दाराची राख रांगोळी झाली हजारो प्रपंच उध्वस्त झाले कित्याक जण जायबंदी झाली परंतु निजामशाही व रजाकरांच्या जुर्मापुढे गुडघे न टेकता निखाराने लढा देऊन हैदराबाद संस्थान आणि मराठवाडा जुलमी निजामशाहीतून स्वतंत्र होऊन भारतात सामील झाले या लढ्यात हजारो स्वतंत्र सैनिकांनी सक्रिय लढा दिला त्यापैकी एक श्री वसंत भगवान उंबरे हे होते
वयाच्या 12 व्या वर्षीपासून त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यामध्ये आपले योगदान देण्यास सुरुवात केली निजामाच्या सैनिकांची नजर चुकवून मुक्तिसंग्रामाचा लढा अधिक तीव्र करणाऱ्या स्वतंत्र सैनिक मध्ये वसंत भगवान उंबरे यांचा मोलाचा वाटा आहे त्यावेळी उस्मानाबाद आणि परिसरातून विविध मार्गातून मोठ्या प्रमाणात महसूल कर वसूल केला जात होता व मोठ्या प्रमाणात जमा होणारा महसूल निजामांना मिळू नये यासाठी मोहीम हाती घेतली व आर्थिक नाकेबंदी सुरू केली त्यामुळे निजामाची रझाकार सैन्य चवताळले त्यांनी आंदोलनाका विरुद्ध मोहिम हाती घेतली तेव्हा रजाकारांनी प्रति हल्ले करून त्यांच्या छावणी लुटण्याचे काम केले अनेकदा त्यांना अटक ही झाली प्रत्येक वेळी निरनिराळ्या नाव आडनावे बदलून त्यांनी निजामाच्या सैन्याला हुलकावणी दिले.
प्रसंगी उपाशी राहून दिवस काढले वसंत उंबरे यांची आई फुलाबाई उंबरे व मावशी चतुरा बाई मडके यांनी गवऱ्या वेचण्याच्या निमित्ताने टोपलीत भाकरी ठेवून वर गौऱ्या रचून जेवण पुरवण्याचे काम करत होत्या
निजाम सैनिकांना वसंत उंबरे हे आपल्या विरोधात कारवाया करण्यात आघाडीवर आहेत हे समजल्यावर त्यांनी संधी साधून उंबरे कुटुंबीयांच्या घरावरच हल्ला चढविला. घरावर आणि दारावर बेछूट गोळीबार केल्यानंतर कसलाही आवाज येत नसल्यामुळे सैनिक निघून गेले. आजही निजाम सैनिकांनी केलेल्या गोळीबाराची खूण उंबरे कुटुंबीयांच्या जुन्या घराच्या दरवाजावर तशीच आहे.
निजाम राजवटीविरुद्ध जनक्षोभ वाढत चाललेला असताना सैनिकांनी धरपकड सत्र सुरू केले. त्यात अण्णांना देखील अटक झाली. त्यांना खर्ड्याच्या किल्ल्यात पंधरा दिवस कैदेत ठेवण्यात आले. कैदेत ठेवल्यानंतर जेवण नाही, पाणी नाही, तरीही केवळ आपला भूभाग स्वतंत्र झाला पाहिजे या एकाच इच्छेवर ते जिवंत राहिले. अखेर त्यांची सुटका झाल्यानंतर रघुनाथ टेळे यांच्यासोबत खर्ड्याच्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन भूमिगत राहुन मुक्तिसंग्रामाचा लढा आणखी तीव्र केला.
सर्वांनी एकजुटीने दिलेला लढा आणि देशाचे पहिले संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेतल्याने सलग तीन दिवसाच्या पोलीस अॅक्शननंतर निजाम शरणागती पत्करत हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यास राजी झाला. तो दिवस होता 17 सप्टेंबर 1948. हा दिवस आणि त्यासाठी पुकारलेल्या लढ्याच्या आठवणी अण्णा नेहमीच आम्हा मुलांना सांगायचे. मुक्तिसंग्राम लढा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाकडेही लक्ष देऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. पत्नी कलावती, चार मुली शोभा, शीला, सुनिता व प्रभावती तर दोन मुले नाना आणि मनोज या सर्वांवर त्यांनी आपल्या हयातीत खूप प्रेम केले. 1924 सालचा जन्म असलेल्या अण्णांची 24 डिसेंबर 2008 रोजी प्राणज्योत मालवली. 84 वर्षाचे आयुष्य जगलेल्या अण्णांचा जीवनातील मोठा काळ संघर्षातच गेला, पण त्यांनी सांगितलेल्या मुक्तिसंग्रामाच्या आठवणी आजही आमच्या मनात घर करुन आहेत.
एकदा गावात रजाकरांनी जाळपोळ करत आंदोलनाकावर थेट गोळीबार केला परंतु आपणही पकडले जाणार निजामाचे सैनिक गोळ्या घालणार परंतु आपण गेलो तर ही लढाई अर्धवट राहील म्हणून निजामाच्या हल्ल्यात मरण पावलेले मृतदेहाच्या लाईनीत स्वतः अंगावर कपडे घेऊन मरण पावल्याचे नाटक केले निजामाच्या सैन्याने हे सर्व मृतदेह डोंगरातून खाली फेकून दिले त्यात जिवंत वसंतराव उंबरे यांना खाली फेकून दिले त्यात ते गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांनी धीर सोडला नाही तसेच निजामांना
वसंतराव भगवान उंबरे हे आपल्या विरोधात कारवाया करण्यात आघाडीवर आहेत हे समजल्यावर त्यांनी संधी साधून उंबरे कुटुंबियांच्या घरावर हल्ला चढविला घरावर आणि दारावर बेछूट गोळीबार केल्यानंतर कसलाही आवाज येत नसल्यामुळे सैनिक निघून गेले गोळीबाराची खून उंबरे कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजावर तशीच आहे वसंत उंबरे हे गुप्तचराचे काम करत होते ते सशस्त्रसाठा जमा करून वेळोवेळी त्यांचा पुरवठा करत असल्यामुळे हाच सुगावा काही निझामाना लागल्यामुळे त्यांनी वसंत उंबरे यांना शोधण्यास सुरुवात केली व त्याचवेळी त्यांची बायको कलावती यांनी ज्वारीच्या कणगीत लपवून ठेवले व त्यांच्या आई जेवायला बसली असताना सैनिकांनी येऊन त्यांच्या ताटामध्ये लघवी केली व त्यांना मारहाण केली व निजाम राजवटी विरुद्ध जनक वाढत चाललेला व धर पकड सत्र सुरू केले व वसंत उंबरे यांना खरड्याच्या किल्ल्यात पंधरा दिवस किल्यात ठेवण्यात आले अखेर त्यांची सुटका झाल्यानंतर खरड्याच्या कॅपमध्ये भूमिगत राहून लढा तीव्र केला आणि अखेर भारतात मराठवाडा विलीन करण्यास निझाम राजी झाला तो दिवस होता 17 सप्टेंबर 1948 हा दिवस आणि त्यासाठी पुकारलेला लढ्याच्या आठवणी वसंतराव भगवान उंबरे नेहमीच आम्हा मुलांना सांगायचे या लढ्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी कुटुंबांकडे लक्ष देऊन मुलाचे शिक्षण पूर्ण केले पत्नी कलावती चार मुली शोभा शीला सुनीता व प्रभावती तर दोन मुले नाना आणि मनोज या सर्वावर त्यांनी आपल्या हयातीत खूप प्रेम केले 1924 सालचा जन्म असलेले वसंतराव भगवान उंबरे यांचा 24 डिसेंबर 2008 रोजी प्राणजोत मावळली