विस्तार अधिकारी श्री. मनोहर वाघमोडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आढावा…

लोहारा ( जि.धाराशिव ) : निवृत्ती हा असा प्रसंग आहे. जिथे माणसाला बोलण्यासाठी शब्द कमी पडतात कारण त्यावेळी मनात संमिश्र भावना निर्माण होतात. त्या वेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर आनंदाचे क्षण आणि दुःखाचे दोन्ही क्षण आच्छादलेले असतात. ही सत्य परीस्थिती आहे. शुक्रवारी विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री.मनोहर गुंडाप्पा वाघमोडे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त…
• विस्तार अधिकारी (शिक्षण)
श्री मनोहर गुंडाप्पा वाघमोडे
• मुळ गाव आष्टा (का.) ता. लोहारा सध्याचे राहण्याचे ठिकाण मु.पो. लोहारा, ता. लोहारा, जि.धाराशिव
• एकूण सेवा 37 वर्षे 5 महिने
• सेवेच्या संपूर्ण कालावधीत एकदाही बदली झाली नाही. सेवेचा संपूर्ण प्रवास
पदोन्नतीने. • प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी.
• सेवेचा तपशिल –
07/10/1985 प्राथमिक शिक्षक प्रा.शा. चांदवड ता. भूम (9 वर्षे 10 महिने) 07/08/1995 प्राथमिक पदवीधर कें.प्रा. शा. लोहारा ता. लोहारा (9 वर्षे 7 महिने) 04/03/2005 केंद्रप्रमुख केंद्र माकणी ता. लोहारा ( 17 वर्षे 6 महिने)
22/09/2022 विस्तार अधिकारी (शिक्षण) बीट जळकोट (6 महिने) • 07 ऑक्टोंबर 1985 साली चांदवड ता. भूम येथे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेची सुरुवात
• सेवेच्या अवघ्या 7 व्या वर्षी तालुका शिक्षक पुरस्कार.
• चांदवड ता. भूम या शाळेसाठी गावालगतच्या 1 एकर जमिनीचे दानपत्र त्यामुळे जिल्ह्यातील उत्कृष्ठ शाळा सुधार मोहिमेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक.
• भारत ज्ञान विज्ञान जत्था जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे नेतृत्व.
• कुटूंब कल्याण व साक्षरता अभियान यामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक.
• विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तीमत्व विकासासाठी प्रतीवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
• दि.07/08/1995 रोजी पदोन्नतीने बदली प्रसंगी चांदवड या शाळेतून निरोप
देताना ‘ अन् सर्व गावाने अश्रू ढाळले. ‘
• स्वतः चे अप्रकाशित सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर हे तीन अंकी नाटक, • लातूर विभागाच्या ‘ज्ञानसाधना’ या वार्षिक विशेषांकात संपादकीय मंडळात व
प्रवक्ता म्हणून कार्य • META महाराष्ट्र इंग्लीश टिचर्स असोसिएशन’ च्या माध्यमातून इंग्रजी विषयाचे
भरीव कार्य..
• इंग्रजी विषय अध्यापनात विशेष कौशल्य.
• स्वतः हार्मोनियम वादक.
• 2002 साली जिल्हा शिक्षक पुरस्कार.
शैक्षणिक कामकाजाबाबत 5 वेळा जादा वेतनवाढी प्राप्त
उत्कृष्ठ • शाळा तेथे प्रयोगशाळा’ या उपक्रमाचे प्रथम मानकरी.
• शाळा तेथे प्रयोगशाळा’ हा पथदर्शी उपक्रम राज्याने स्विकारला.
• केंद्र माकणी येथे ‘सुंदर माझे कार्यालय’ या मा. आयुक्त औरंगाबाद यांच्या उपक्रमाची 15 वर्षापूर्वी कार्यवाही. वरील उपक्रमास मा. श्री. डॉ. प्रविण गेडाम जिल्हाधिकारी उस्मानाबाद, मा. श्री.
विलास जगताप विभागीय उपायुक्त, मा. श्री. अ.ज. ठाकरे शिक्षण उपसंचालक
लातूर यांनी पाहणी करुन कौतूक केले.
‘सुंदर माझे कार्यालय’ व ‘शाळा तेथे प्रयोगशाळा’ या उपक्रमास मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अधिका-यांनी भेटी दिल्या.
2008 साली राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार.
• विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा परिक्षेचे आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी ‘मिशन
स्कॉलरशिप’ या उपक्रमाचे प्रभावी आयोजन.
• अपघात गंभीर जखमी श्री बी एल पवार या शिक्षकास स्वतः पुढाकाराने भरीव मदतनिधी जमवून उपचारास मदत केली.
• इयत्ता 10 वी परिक्षेत 96 टक्के गुण घेतलेल्या लोहारा येथील स्नेहा स्वामी या विद्यार्थीनीस पुढील शिक्षणासाठी स्वतः पुढाकाराने भरीव मदतनिधी जमवून मदत केली.
• 31 मार्च 2023 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्ती.