सुभाषचंद्र बोस कॉलेज मध्ये सूरज पुकाळेचा सत्कार

लोहारा : लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेचा माजी विद्यार्थी सूरज पुकाळेचा राज्य सुरक्षा दलात निवड झल्याबद्दल प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी सत्कार केला. सूरज पुकाळेचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे झाले. माझा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम येथील प्राध्यापकानी केले असे सूरज म्हणाला. कमवा व शिका या प्रेरनेतून दररोज सकाळी वर्तमाणपत्र वितरण करून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असे सूरज म्हणाला. जिद्द व गुणवत्ता असेल तर आजही नोकरीं उपलब्ध आहेत असे प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी सुरजचा सत्कार करताना उदगार काढले व भावी आयष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रा ज्ञानदेव शिंदे, प्रा प्रशांत काळे, प्रा सुनिल बहिरे,, प्रा उद्धव सोमवंशी, प्रा नारायण आनंदगावकर, प्रा सचिन शिंदे, प्रा राजेंद्र साळुंके, प्रा लक्षमीकांत कुलकर्णी, प्रा राजेशा अष्टेकर, प्रा मुकुंद रसाळ, प्रा दगडू साठे, प्रा विद्यासागर बुवा, प्रा गणेश कांबळे, अंकुश शिंदे, काकासाहेब आनंदगावकर यांच्यासह विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.