डॉ. सुजीत रमेशराव पाटील यांचा सत्कार

लोहारा : डॉ.सुजीत रमेशराव पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने M.S. Ortho (PG) उत्तीर्ण झाल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवानेते किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शहरप्रमुख योगेश तपसाळे, बाजार समिती संचालक सचिन जाधव, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नाना मदनसुरे, युवासेना संघटक शरद पवार, संदीप चौगुले, युवासेना शहरप्रमुख अमर शिंदे, गोपाळ जाधव, पद्माकर पाटील , ऍड गणेश अहंकारी, बशीर शेख गोविंद दंडगुले आदी जण उपस्थित होते.