लोहारा शहरातील जय जगदंबा मंदीरात स्वामी समर्थ सप्ताहाची सांगता

लोहारा : लोहारा शहरातील जय जगदंबा मंदीरात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने स्वामी समर्थ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची गुरुवारी ८ डिसेंबर रोजी सांगता मोठ्या उत्साहात झाली.
या सप्ताहात दररोज सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पोती वाचन, आरती, ग्रंथ वाचन करण्यात आले. या सप्ताहामध्ये केंद्र प्रमुख उज्वला प्रभाकर पवार,माधुरी वकील, आशा बनशेट्टी,सविता जाधव, तुलशी काळे, अर्चना पवार, भाग्यश्री पवार, शालुबाई पवार,सुजाता ठेले, सविता फावडे, सीमा लोखंडे, रजंना फावडे, दिव्या फावडे, स्वामींनी होंडराव,सुजाता पाटील,रजंना ताई,सुमन विरोधी, सुरेखा बुलबुले,महाजन बाई,मई स्वामी, उज्वला तिगाडे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.