वन विभागाअंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यात झालेल्या कामाचा चौकशी करा

लोहारा ( उस्मानाबाद ) : वन विभागाअंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यात गेले पाच वर्षेात करण्यात आलेल्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचर झाला असून याची सखोल चौशीची करून दोषी वनपाल व वनरक्षक फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे तहसिलदार यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसिलदार संतोष रुईकर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, लोहारा व उमरगा तालुक्यात वृक्ष लागवड व झालेल्या कामाचे ठिकाण तसेच त्याठिकाणी कोणती कामे झाली आहेत.
त्याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची मजुरी व गावाचा तपशील द्यावा, लोहारा उमरगा वन विभागात बनावट व्हावंचर नं. ३२ वृक्ष लागवडीसाठी आलेला कोट्यवधी चा निधी संगनमत करून हडप केला आहे.तरी याबाबत सकोल चौकशी करून दोषी वर कारवाई करावी व तसेच त्याची चौकशी करण्यासाठी गाव निहाय विषय दक्षता समिती स्थापन करावी, मागील ५ वर्षापासून वृक्ष लागवडीच्या कामासाठी लावण्यात आलेले मजुराच्या नावाची यादी गावात चावडी वाचन करावे, ज्या मजुराच्या खात्यात पैसे पाठवले तेच मजूर काम वर होते किंवा नाही याची चौकशी करावी, बोगस मजूर ज्यांची साक्षांत पुरावे उपलब्ध आहेत.यातील एका एका मजुरांची दोन दोन नावे आहेत. खाते नंबर ही वेगवेगळी आहेत.अशा बोगस मजूर व त्यांना कामाला आहेत असे दाखवून देणाऱ्या भ्रष्ट व लालची अधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. शासनाची फसवणूक करून भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने आंदोलन करून अमरण उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे लोहारा तालुकाध्यक्ष दादासाहेब रवळे यांची सही आहे.