” विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन चिमुकल्यांची दिंडी”

लोहारा : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे स्कुलमधील सर्व लहान चिमुकल्यांची वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम दिंडीमधील विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून व पालखीचे मान्यवरांच्या हस्ते आरती करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर माऊली – माऊली, राम कृष्ण हरी, “अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर” च्या जयघोषात पंढरपूरला निघालेल्या वारीप्रमाने अतिशय आनंदी व उत्साहमय वातावरणात सर्व चिमुकले दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडीत सर्व चिमुकले वारकरी वेशभूषेत खांद्यावर भगवी पताका, हातामध्ये टाळ, डोक्यावर तुलसी वृंदावन घेवून दिंडीमध्ये पाऊल व फुगडी खेळत, भजन म्हणत सहभागी झाले होते, दिंडी बरोबरच गोल रिंगण सोहळाही संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून लोहाऱ्यातील कृषी सहाय्यक श्री विक्रम निकम, पालक प्रतिनिधी श्री अरुण बप्पा सारंग, मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य श्री यशवंत चंदनशिवे,
जनकल्यान समितीचे श्री शंकर जाधव, संचालिका सविता जाधव, सह -शिक्षक सिध्देश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, सोमनाथ कुसळकर, मीरा माने, माधवी होगाडे, पूजा चौरे, संतोषी घंटे, ईश्वरी आदटराव, अर्चना सोणके, उमा वाघमोडे, चांदबी चाऊस, पूजा नारायणकर तसेच पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.