लोहारा / प्रतिनिधी
मराठा समाजाची शासनाकडून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता न झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज मनोज जारंगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सरकारकडे मागणी करत आहे वेळोवेळी मनोज जारंगे यांच्या आमरण उपोषण वेळी व मुंबई येथील आजाद मैदान येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे व सगेसोयरे यासह मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज मनोज दादा जांरगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करणार असून याबाबत लोहारा तालुक्यातून सकल मराठा समाजाच्या वतीने देखील निवेदन राजनंदनी गोरे या बालिकेच्या हस्ते तहसीलदार लोहारा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज दादा यांच्या नेतृत्वात होत असलेल्या रास्ता रोको आंदोलनास पाठिंबा देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने लोहरा शहरात व तालुक्यात रास्ता रोको आंदोलन घेण्यात येणार आहे मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा मराठा समाजाच्या रोशास सामोरे जावे लागेल असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदनावर महेश गोरे, संजय मुरटे ,बळी गोरे, नितीन मुळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत,.
Back to top button
error: Content is protected !!