दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्विकारले अध्यक्षपदाची सुत्रे

दिल्ली : दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर नवनिर्वाचित कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बुधवारी काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली.
यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीं,काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले.