लोहारा हायस्कूलच्या १५० विद्यार्थ्याची पायी चालत निसर्ग वारी

लोहारा : आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी शहरातील लोहारा हायस्कूल शाळेच्या १५० विद्यार्थ्यांनी लोहारा ते कानेगाव पायी चालत निसर्ग वारीमध्ये सहभाग नोंदवला.
लोहारा शहरातील लोहारा हायस्कुल शाळेचे १५० विद्यार्थ्यानी पायी चालत तालुक्यातील कानेगाव येथील संत शिरोमणी मारुती महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या विद्यार्थ्यानी पायी चालून निसर्गाच्या सोबत एक दिवस रमण्याचा वेगळा अनुभव घेतला. मुला मुलींचा निसर्गातला प्रवास त्यांना निसर्गाची अमर्यादता दाखवून देतो. अवघा महाराष्ट्र भक्तीरसात न्हाऊन निघत असताना या विद्यार्थ्यानी वारीचा पायी चालत अनुभव व आनंद घेतला पाहीजे या उद्देशाने शिक्षकांनी पुढाकार घेत या पायी वारीचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्याबरोबरच यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दयानंद पोतदार,शिक्षक गोपाळ सुतार, संजय घोडके, वैजनाथ पाटील, दिलीप शिंदे, देवकर, विद्या मक्तेदार यांनी सहभागी झाले होते.