कास्ती केंद्राची मिशन शिष्यवृत्ती परीक्षा रंगीत तालीम

लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती (बु) केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांची कानेगाव जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत शनिवारी शिष्यवृत्ती परीक्षेची रंगीत तालीम घेण्यात आली.
केंद्र कास्ती (बु) मिशन शिष्यवृत्ती रंगित तालीम लोहारा बीटचे विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण ,केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे यांच्या संकल्पनेतुन केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार व शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी परीक्षेसाठी १०७ व आठवी परीक्षेसाठी ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी व टिमने विद्या परीषदेच्या धरतीवर परीपुर्ण नियोजन केले होते.प्रश्नपत्रिका एबीसीडी संचासह उत्तरपत्रिकेचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांना कसलीही आर्थिक भार न देता विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंदाचे आर्थिक सहकार्य केले.
शिष्यवृत्ती परीक्षेची एकत्रित केंद्राची रंगित तालीम घेतल्याने विद्यार्थ्यामधील परीक्षेची भिती दुर होईल.परीक्षेतील बारकावे माहीती झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल तसेच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक नक्कीच होतील.यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर नियोजन करण्यात आले आहे असे विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सदरील परीक्षा नियोजन पार पाडण्यासाठी नितीन वाघमारे,शिवाजी पोतदार,प्रविण अगंबरे, बाळासाहेब कदम, मेघराज कदम, भिमाशंकर डोकडे, रमेश कदम,रसुल शेख,नितीन कदम,उद्धव विभुते,सुप्रिया माळवदकर, मच्छिंद्र बोकडे,संजय संदिकर,कंदे , दत्तात्रय माने,दत्तात्रय पांचाळ, सचिन भंडारे,सायलु उप्पलवाड, पटणे, क्षीरसागर,काशिनाथ पवार,जाधव सर यांच्यासह शिक्षकवृदांचे सहकार्य लाभले.