सालेगाव ग्रामपंचायतमध्ये श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

लोहारा : श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती सालेगाव ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आली. यावेळी मूर्तीचे पूजन सौ. भाग्यश्री मुरलीधर पाटील सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला शिवव्याख्याते गोपाळ माने यांनी छत्रपति शिवाजी महाराजांची शासन व्यवस्था कशी होती हे सांगण्यात आले या वेळी आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव यांनी केले या वेळी सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रा. पं. सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, शिलाबाई साळुंके, ग्रामसेवक भोरे एन. बी. चेअरमन मुरलीधर पाटील, डॉ. संदीप बनसोडे, आरोग्य कर्मचारी भालेराव के. पी., एकनाथ देडे ग्रा.पं.शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, पोलीस पाटील बालाजी मातोळे, अंगणवाडी कार्यकर्ती सुवर्णा मातोळे, रंजना भालेराव, व मारुती साळुंके, नितीन देशपांडे, जीवन पाटील, गोपाळ माने, गोविंद मातोळे, यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.