लोहारा तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रोहन माने यांनी मारली बाजी

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील बसवेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये ३५ किलो वजन गटात लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल मधील इयत्ता सहावी वर्गातील रोहन सुरेश माने या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत तालुक्यातील प्रतिस्पर्ध्याला चीत करून प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावरील स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. या विद्यार्थ्याला पैलवान रामेश्वर कार्ले यांनी मार्गदर्शक केले. या यशाबद्दल स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, सिद्धेश्वर सुरवसे,सुरेश माने यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.