ॲड.परमेश्वर बिराजदार यांचा भाजपात जाहीर प्रवेश

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील ॲड.परमेश्वर सदाशिव बिराजदार यांनी मुरूम येथे मोदी @9 महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या भव्य मेळावा मुरूम येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होता. या संमेलनाचे प्रमुख अतिथी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. रणाजगजीतसिह पाटील यांच्या उपस्थितीत येणेगुर येथील माजी ग्राम पंचायत सदस्य ॲड.परमेश्वर सदाशिव बिराजदार यांनी प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा संयोजक नेताजी पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, मा.जिल्हा परिषद बांधकाम सभापती अभय भैय्या चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष त कैलास शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनीयार उमरगा तालुका उपाध्यक्ष शेखर मुदकन्ना, आदी उस्थितीत होते. येणेगुर येथील काँग्रेसचे निष्ठावंत व मातब्बर नेते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब बिराजदार यांचे कनिष्ठ बंधू विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप बाबासाहेब बिराजदार यांचे चुलते आहेत. यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने येणेगुरात काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची दिसून आले. येणाऱ्या काळात काँगेस पक्षात खिंडार पडण्याची शक्यता आहे. या प्रवेशासाठी श्रीकांत मिणीयार, सागर पाटील यांनी प्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!