लोहारा (प्रतिनिधी) : फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशपरंपरेला पुढे चालना दिली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 91.25% इतका लागला असून विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे :
विज्ञान शाखा : 99.21%
वाणिज्य शाखा : 91.83%
कला शाखा : 81.81%
विज्ञान शाखा :
या शाखेत 127 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यात 4, प्रथम श्रेणीत 63, द्वितीय श्रेणीत 56, तृतीय श्रेणीत 1 आणि केवळ 1 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला.
प्रथम क्रमांक – कु. जाधव देवकन्या बालाजी (78%)
द्वितीय क्रमांक – कु. वाघमारे वैशाली वामन (76.83%)
तृतीय क्रमांक – कु. पाटील ईश्वरी प्रफुल्ल (76%)
कला शाखा :
एकूण 110 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यात 3, प्रथम श्रेणीत 12, द्वितीय श्रेणीत 63, तृतीय श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 20 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
प्रथम क्रमांक – कु. हेड्डे तैसीन हबीब (83.50%)
द्वितीय क्रमांक – कु. माने माहेश्वरी श्रीरंग (80%)
तृतीय क्रमांक – कांबळे यश बाबासाहेब (78.83%)
वाणिज्य शाखा :
एकूण 49 विद्यार्थ्यांपैकी 8 विशेष प्राविण्य, 12 प्रथम श्रेणी, 24 द्वितीय श्रेणी आणि 4 अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत.
प्रथम क्रमांक – कु. हुलगुंडे संध्या पांडुरंग (85.67%)
द्वितीय क्रमांक – कु. कदम अंकिता आत्माराम (84.17%)
तृतीय क्रमांक – कु. शिवकर तृप्ती रमेश (81.67%)
या घवघवत्या यशाबद्दल संस्थेचे सचिव तसेच शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अधिक बळकट झाली असून भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Back to top button
error: Content is protected !!