मी, सोनाली भोजने आणि माझा शैक्षणिक प्रवास…

सर्वप्रथम मी माझा शैक्षणिक परिचय करून देते.
इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत च शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणेपुर येथून पूर्ण केलं. गावात इ. 5 वी चा वर्ग नसल्यामुळे मला शेजारी गावातून 5वी ते 7 वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव , तसेच 8 वी ते 10 वी श्री एस. पी. हायस्कूल वडगांव इथून पूर्ण करावं लागला.

HTML img Tag Simply Easy Learning

तेव्हा रोज पायी चालत 6 km जाणे येणे करावे लागायचे , रस्त्याचं डांबरीकरण सुद्धा झालेलं नव्हत. ऊन म्हणायचं नाही पाऊस म्हणायचं नाही न चुकता रोज पाठीवर मोठी पुस्तकांची बॅग घेऊन शाळेला जान येणं सुरू असायचं. ह्या गोष्टीला 10 वर्ष उलटून गेली बराच बदल ह्या नगरी मध्ये झाला आहे रस्त्याचं डांबरीकरण झालं, पावसाळ्यात ओढ्याला पुर आला की रस्ता ओलांडून जान म्हणजे एक वेगळीच भीती असायची तिथे आज पुलांच काम झालेलं आहे. पण अजूनही खंत एका गोष्टीची वाटते ती म्हणजे आजही मुलांना 6 km बॅग च ओझ घेऊन चालत जावं लागतं. मला मनापासून वाटत ह्याचा सर्वांनी विचार करावा आणि आपलं उज्वल भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाण्या येण्याची सोय करावी. जसं अभ्यासिकेमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात तशी त्यांना सायकली उपलब्ध करून देता आल्या तर उत्तम होईल.
मी 10 वी मध्ये 88.36 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला…तेव्हा ही ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेकडून गुणवंतांचा सत्कार करण्यात आला होता आणि आज ही ती परंपरा सुरू आहे याचा अभिमान वाटतो.

10 वी नंतर करायचं काय ? सगळ्यात मोठा प्रश्न डोळ्यासमोर होता… ना माहिती घायला जवळ अँड्रॉइड मोबाईल होता, कोणाला जाऊन विचारावं इतकं हिम्मत ही नव्हती. बाहेरील द्यान खूप कमी म्हणालात तरी वावग ठरणार नाही. माझ्या अभ्यासाच्या प्रेरणे बद्दल बोलायचं झालं तर… ते म्हणजे “स्वतःला वाटणारी भीती” 10वी च्या सराव परीक्षा मध्ये पडलेले गुण जेव्हा वर्गात सांगितले जायचे, सर्वात जास्त गुण घेऊन ही मला आनंद व्हायचा नाही त्याचं कारण एवढंच की, आज गुण मिळाले पण बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण पडले तर… जेव्हा माझा गणिताचा पैकी च्या पैकी गुण घेतलेला पेपर वर्गात दाखवला जायचा तेव्हा जबाबदारी वाढल्या सारखं वाटायचं. स्वतःला नेहमी कमी लेखून परत अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची. ह्याच जर तर च्या प्रेरणेचा मला 11 वी , 12 वी मध्ये अभ्यासात सातत्य ठेवण्यासाठी बराच फायदा झाला. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत, अभ्यासाचं वेळापत्रक, अभ्यास करण्यासाठी लागणारी प्रेरणा ही वेगळी असते आणि ती आपण स्वतः स्वतःमध्ये शोधली पाहिजे हे एका दशकापूर्वी आहे . आज डिजिटल इंडिया होत चाललाय 90% टक्के विद्यार्थ्याच्या घरी Android मोबाईल आहेत. तुम्ही हवं ते पाहिजे तेव्हा search करू शकता. YouTube वर पाहू शकतो. अस मला वाटत.

माझे मार्गदर्शक ‘माझे मामा’ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 11 वी ला डॉ. चंद्रभानू सोनवणे ज्युनिअर कॉलेज लातूर इथे सायन्स ला प्रवेश घेतला. कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यावर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हे कॉलेज माझ्यासारख्या तळागाळातील होतकरू, जिद्दी आणि चिकाटीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभ आहे. 10 वी पर्यंत मराठी मिडीयम असल्यामुळे बऱ्याच वेळेस science लिहिताना i आधी लिहायचं की e इथून सुरुवात झाली होती. पण गणिताचा पाया पक्का असल्यामुळे आत्मविश्वास ढळू दिला नाही. सुरवातीची 2 महिने रात्रीची दिवस करून बरीच मेहनत घेतली. स्वतःला परीक्षा यादी मध्ये टॉप 30 मध्ये आणलं. नवीन शहर, नवीन माणसं, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले विदयार्थी, घरापासून पहिल्यांदा दूर गेले होते त्या काळात मानसिक आधार लाभला तो म्हणजे माझ्या मामी चा. सतत मला कुठल्याही गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहायला त्यांनी शिकवलं. ” सोनू तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती जिद्द आहे हार मानायची नाही.” आणि त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली अजूनही ते दिवस आठवले की मन भरून येत. त्या माऊलीला माझा सलाम.
मला अजूनही आठवत शेजारच्या काकूंनी मला आशीर्वाद देताना म्हणाल्या होत्या तुझा चांगल्या COEP सारख्या कॉलेज ला नंबर लागू दे.
आई वडिलांच्या कष्टाचं फळ असो, माझ्या चढ उतारत सोबत असलेले माझे नातेवाईक, सर्व शिक्षक आणि मी घेतलेले परिश्रम आणि सातत्य ह्या सर्वामुळे मला 12 वी मध्ये 81.23 टक्के आणि JEE मध्ये कॉलेज मधून 3 नंबर मिळवून माझा COEP ला नंबर लागला.
त्या मेहनती साठी :
“डर मुझे भी लगा था फासला देख कर,
पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,
खुद ब खुद मेरे नजदीक आती गई,
मेरी मंजिल मेरा हौंसला देख कर ”

माझ्या ध्येयाबद्दल बोलायचं झालं तर …
तेव्हा स्वतःच्या आवडी निवडी कळायच्या नाहीत. पण एक मात्र नेहमी होत “बनायचं तर वडीलांसारख!” मी माझ्या वडिलांना समाजामध्ये काम करताना खूप जवळून पाहिलं आहे. त्यांची लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ची धडपड, जेव्हा ते सांगतात त्यांना ही उच्च शिक्षण घ्यायची इच्छा होती पण लहानपणी परिस्थिती बिकट असल्यामुळे ते शक्य झालं नाही. पण त्या ही काळात त्यांनी पुरेस शिक्षण घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी ला लागले. आणि माझ्या माहिती प्रमाणे ते आमच्या माळी कुटुंबात सरकारी नोकरी मिळवणारे पहिलेच होते. ह्याचा मला आज ही अभिमान वाटतो. परिस्थितीवर मात करून समाजामध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करून त्याचं आधारवड बनवणं सगळ्यांना जमेलच आस नाही. मला गर्व आहे मी अश्या मनाने दिलदार, कर्तृत्वाने श्रीमंत योगी असलेल्या व्यक्तीच्या घरी जन्म घेतला. अभिमान आहे मी त्यांची मुलगी असल्याचा. फ्कत जिद्द होती आपल्याला ही आस काहीतरी करायचं आहे एक दिवस त्यांना ही मुलगी म्हणून माझा अभिमान वाटेल.

इंजिनीअरिंग ला admission घेताना फक्त 6 autonomous सरकारी कॉलेज ची नावे स्थापत्य अभियांत्रिकी साठी भरली होती. आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझा पहिल्या रोऊंड मध्ये COEP मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी ला admission झालं.
COEP ची सुरुवात इथून झाली. ह्या कॉलेज मधल्या 4 वर्षांनी मला खूप काही दिलं, इथे खूप काही अनुभवायला मिळालं. अभ्यासापासून स्वतःला थोडंसं दूर ठेवून स्वतःची कामे स्वतः करताना येणाऱ्या अडचणी अनुभवायला मिळाल्या, वेगवेगळ्या ॲक्टिविटी मध्ये सहभागी होन असेल, नवीन मित्रपरिवार जोडणं, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, स्पंदन सारख्या ग्रुप जो सोशल ॲक्टिविटी (उदा. ब्लड डोनेशन कॅम्प ) घेतो. जिथे मला थोडफार का असेना स्वतःचे विचार ठाम पणे कसे मांडायचे शिकायला मिळालं.
आयुष्भर सोबत राहतील असा मित्रपरिवार मिळाला.
COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग तर आहेच माझ्यासाठी ते कॉलेज ऑफ एवरीथिंग आहे. COEP: ‘Tough to get in, toughest to say goodbye.’

2018 ला माझं स्थापत्य अभियंता पदवी च शिक्षण पूर्ण झालं. खरी कसरत हया 4 वर्षांनंतर होती, ध्येयासाठी प्रयत्न करण्याची, ह्या प्रवासात मोलाचं वाटा उचलला तो माझ्या भावाने वेळोवेळी मार्गदर्शन त्याने केलं. 2019 ला मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली त्याचा पूर्व, मुख्य टप्पा मी पहिल्या प्रयत्नात यशस्वी केला. त्यांनतर कोविड सारख्या महामारीमुळे आणि मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मिळालेल्या स्थगिती मुळे त्याचा आमच्या परीक्षा प्रक्रियेवर खूप मोठा परिणाम झाला. जवळपास दीड वर्षानंतर आमच्या मुलाखती झाल्या.
2019 ते 2022 हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. स्वतःचा संयम जो सरकार प्रणाली मध्ये काम करताना गरजेचा असतो. स्वतःचा ठामपणा, स्वतःवर असलेला विश्वास, माझा जर तर, घरच्यांनी दिलेली साथ, माझ्या कठीण काळामध्ये माझ्या सोबत असलेला माझा मित्रपरिवार, नातेवाईक यांची मी आयुष्भर मनापासून ऋणी असेल.
मनामध्ये वेळ खाऊ प्रक्रियमुळे निर्माण होणार नैराश्य बाजूला ठेवून आनंदाचा वातावरण निर्माण करून घरच्यांसोबत आयुष्यातले मौल्यवान क्षण घालवायला मिळाले ह्यात मी माझं समाधान मानते.
कहते है “लोग वक्त के साथ खैरियत नही हैसियत पूछते हैं” लोकांच्या अनंत अश्या प्रश्ननांना उत्तरे देत परीक्षा प्रक्रिया समजावत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पेलत बहुप्रतिक्षित, बहुचर्चित परीक्षेचा अंतिम निकाल 13 एप्रिल 2022 ला लागला. कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है, आणि तसच झालं. माझी सहायक अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड झाली. मी माझ्या आयुष्याचं मोठं (पण नक्कीच शेवटचं नाही) ध्येय गाठलं.

आणि त्याच बांधकाम विभागासाठी दोन ओळी: ‘इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है’.

ह्या परीक्षेची तयारी करताना माझी एक इच्छा होती, माझा भाऊ आणि वडील सा. बां. खात्यामध्ये कार्यरत आहेत. माझीही अभियंता म्हणून ह्या खात्यात निवड व्हावी अशी माझी इच्छा होती आणि शेवटी ती इच्छा पूर्ण झाली. ‘बांधकाम खात्याचे सख्खे अधिकारी; बाप, मुलगा, मुलगी.’

ह्या स्वप्नाला ध्येय बनवून सत्यात उतरवण्यासाठी माझ्या आईने, माझ्या माऊलीने, माझं सर्वस्व ती, तिचे कष्ट मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही तिच्यासाठी हे शब्द अपुरे आहेत. सलाम त्या प्रत्येक आईला जी आपल्या घराला घरपण देते, निःस्वार्थी मनाने आपल्या साठी अहोरात्र झटते, आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करते. तीच अंतःकरण समजून घाय्याल मन ही तितकं मोठं लागतं. माझं यश मी माझ्या आईला देते.
आईसाठी : “ये जीत मेरी अभिमान तेरा
ये जीवन तेरा उपकार हैं ”

शेवटी,
त्या ध्येयवादी वाचकांसाठी :
“” जमीन पर बैठ के क्यो आसमान देखता हैं.
पंखो को खोल , जमाना सिर्फ उडान देखता हैं
लहरों की तो फितरत ही हैं , शोर मचाने कि
मंजिल उसी की होती है, जो नजरो मे तुफान देखता हैं.
हर पतंग जानती हैं अंत मे कचरे मे ही जाना हैं,
लेकिन उससे पहले हमे आसमा छुके दिखना हैं.
घोंसला बनाने में यूँ मशग़ूल हो गए,
उड़ने को पंख हैं, हम ये भी भूल गए.
उठो जागो!
ना रुको तब तक,
ना हो जाये लक्ष्य, प्राप्त जब तक़.”
जय हिंद, जय भारत

सोनाली राजेंद्र भोजने
सहायक अभियंता श्रेणी 2
सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!