शिष्यवृत्ती परीक्षेत काव्याची गगनभरारी…

लोहारा : लोहारा येथील उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी गुंजोटी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल लोहाऱ्याची विद्यार्थिनीने एप्रिल 2023 मध्ये झालेल्या इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कु. काव्या किशोरकुमार चौधरी हिने 288 गुण (81.33%) मिळवत तुळजापूर,उमरगा, लोहारा या 3 तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पहिला येण्याचा मान मिळवत प्रशंसनीय यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, स्कुलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव, संचालिका सौ सविता जाधव यांनी तिचे अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शक श्री सिध्देश्वर सुरवसे, पालक श्री किशोर रमेश चौधरी यांच्यासह शिक्षक व पालक वर्गातून तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!