शिक्षक व सेवकांची पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लोहारा :  लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची १९ वी सर्वसाधारण सभा माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख,चेअरमन राम मुसांडे,राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त मनोहर वाघमोडे,विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव,सुभाष चव्हाण, नगरसेवक आरती कोरे, अमिन सुंबेकर,जालींदर कोकणे, गौस मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सेवानिवृत्ती निमित्त मनोहर वाघमोडे, दिपक पोतदार,मदन कुलकर्णी, माधवराव गवळी, पांडुरंग समदळे,हणमंत सगर,अशोक जाधव, शांतविरप्पा जट्टे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षक पुरस्काराने गुरुनाथ पांचाळ जि.प.के. प्रा. शा. लोहारा, श्रीशैल जट्टे प्रा.शा.कानेगाव, राहूल भेडे प्रा. शा. माळेगाव, सुभाष नागणे जि. प.कन्या आष्टा,श्रीम.शितल जाधव जि प्रा. शा. हराळी, राजपुत्र पाटील जि.प.प्रा. शा. सास्तूर, आदर्श कर्मचारी कोळी मंदोदरी जि प के प्रा.शा.कास्ती, आदर्श शाळा पुरस्कार जि.प.प्रा. शा. भोसगा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. यानंतर उज्वल यश संपादन केल्याबद्दल आदर्श कुमार, आदित्य नन्नवरे, भक्ती पांढरे, रितेश बनकर, यांचा प्रेरणादायी पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर ठेवीदार सभासद मोहन शेवाळे, पंडीत राठोड, विजयकुमार बुकन यांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवत ठेवी ठेवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक संघटना अध्यक्ष म्हणून सुदर्शन जावळे, दत्तात्रय फावडे, सुरेश साळुंके, विकास घोडके, शफीक गवंडी,नारायण घोडके, डावरे सर दत्तात्रय दंडगुले,मच्छिंद्र बोकडे तसेच महीला तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी,संतोष भोजने, सचिन भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विकास घोडके यांनी करून पतसंस्थेचा लेखाजोखा मांडला.यामध्ये एकुण सभासद ३५४ आहेत. भागभांडवल ९ कोटी असुन दिर्घ मुदत कर्ज १० लक्ष, तातडी कर्ज १ लक्ष वाटप करण्यात येते.
व्याजदर ९%, या आर्थिक वर्षात एकुण नफा ५४ लक्ष रूपये झाला असून लाभांश ९.७५% दराने देण्यात येणार आहे. सभासदांसाठी १२.५ लाखाची विमा योजना, ऑनलाईन लाभांश वाटप करणारी पहीली संस्था, संचालक मंडळ १२वर्ष विनामानधन कामकाज पाहते,पतसंस्थेची स्वतःची भव्य इमारत,१००℅ जाहीरनाम्यातील कामाची पुर्तता झाल्याचे सांगितले. यानंतर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक करून संचालक मंडळाच्या व स्थानिक नगरसेविका आरती कोरे यांच्या मागणीनुसार सोसायटी समोरील सिमेंट रस्त्यासाठी १५ लक्ष रूपये निधी मंजूर करून सोसायटीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर मनोहर वाघमोडे, शितल वाघमारे,शांतविरप्पा जट्टे,भास्कर बेशकराव, अशोक जाधव यांनी संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पारदर्शी काटकसरीने व्यवहार, सभासद हिताचे निर्णय याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक जवळगे यांनी पतसंस्थेच्या जडणघडणीसाठी कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या कार्याची दखल घेत पतसंस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत पांढरे यांनी केले तर आभार सचिव विश्वजित चंदनशिवे यांनी मांडले. यावेळी संचालक दत्तात्रय पांचाळ, जिवनराव गायकवाड,एस.के.जगताप,सी. जी. माळी, चंद्रकांत कदम,गीतांजली मोटे,दत्तात्रय फावडे,मेघराज कदम,शेख एस. एम,गजानन मक्तेदार,कोंडीबा कारभारी,मधुकर चंदनशिवे,बाळासाहेब कदम,सतीश माळी, नितीन वाघमारे,श्रीम.उलन कांबळे, मुक्ता माळी,माया शिंदे, नितीन वाघमारे, गोविंद जाधव,राहुल ओवांडकर, रफीक शेख,मनोरथ भोजने,महादेव कुंभार, श्रीम. अर्चना साखरे,शंकर काळे,प्रविण शिंदे,नितीन वाघमारे, सचिन भोसले, गजानन सुतार, गणेश काळे,गणेश वाघमारे, परमेश्वर सुर्यवंशी,बलभीम क्षीरसागर,यांच्यासह शेकडो सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र कोकणे, किरण दाशीमे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!