धाराशिवराजकीय

भाजपाचे नेते बसवराज पाटील यांच्या विजयानंतर महायुती पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

लोहारा | प्रतिनिधी
धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी बहुमताने विजय संपादन केल्याबद्दल लोहारा शहरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात सोमवार (दि. २२ जून २०२६) रोजी आयोजित कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी बसवराज पाटील यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आगामी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार सुरेश धस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी, संग्राम पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ग्रामपंचायत माजी सदस्य संजय दरेकर, रोहन खराडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!